अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंग यांनी यांच्या आगामी “सरदार का ग्रॅंडसन’ मधील “जी नै करदा’ या गाण्याचा एक टीजर रिलीज केला गेला आहे. एका विवाहसमारंभातील संगीताच्या कार्यक्रमात ढोलाच्या तालावर चाललेला धुमधडाका या टीजरमध्ये बघायला मिळतो. अर्जुन आणि रकुल दोघेही बेधुंद नाचताना दिसतात.
निकिता गांधीसह पंजाबी गायक मानक ई आणि जास मानक यांनी हे गाणे गायले आहे. तनिष्का बागचीचे संगीत असलेल्या या गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या आणि 018 च्या “पद्मावत’ मध्ये “घूमर’ या गाण्यासाठी दीपिका पदुकोणला नृत्य दिग्दर्शन केलेल्या कृती महेशने नृत्यदिग्दर्शन केले आहे. “आदिती राव हैदरी आणि जॉन अब्राहम हे यातील अन्य कलाकार असतील.
याच वर्षी 18 मे ला सरदार का ग्रण्डसन’ नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय “संदीप और पिंकी फरार’,”एक व्हिलन रिटर्न्स’ आणि “भूत पोलीस’ हे अर्जुन कपूरचे अन्य सिनेमे पाईपलाईनमध्ये आहेत.