“दबंग 3’मधील नवीन गाण्याचा टीझर रिलीज

बॉलीवूडचा चुलबुल पांडे अर्थात सलमान खानचा आगामी चित्रपट “दबंग 3′ मधील बहुप्रतिशक्षित “मुन्ना बदनाम हुआ’ गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी सलमान खानने या गाण्याची पहिली झलक शेअर केली आहे.

प्रेक्षकांमध्ये “दबंग’ सिरिजमधील पहिल्या दोन चित्रपटांमधील “मुन्नी बदनाम…’ आणि “फेविकॉल से…’ या गाण्यांनी खूपच प्रसिद्धी मिळविली होती.

असेच एक हटके गाणे यावेळी “दबंग-3’मध्ये प्रेक्षकांना पाहण्यास मिळणार आहे. याची झलक सलमान खानने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. सलमानने पोस्ट करताना, आ रहे हैं बहुत जल्द सबसे बदमाश गाने मुन्ना बदनाम हुआ के साथ, असे कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, सलमान खानसोबत “दबंग 3′ मधील “मुन्ना बदनाम हुआ…’ या गाण्यात वरीना हुसैन दिसून येत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे दिग्दर्शक प्रभुदेवाही या गाण्यात झळकणार आहे. हे गाणे लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे.

या चित्रपटातून महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. याशिवाय सलमान खानसोबत सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान आणि माही गिल हे देखील मुख्य भुमिकेत दिसून येणार आहेत. यामध्ये खलनायक म्हणून साउथचे स्टार किच्चा सुदीप दिसून येणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.