#video# ‘खारी बिस्किट’चा टीझर रिलीज

मुंबई : मराठी चित्रपटांच्या यादीत आणखी एका दमदार चित्रपटाचा समावेश होणार आहे. खारी बिस्किट या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. पाच वर्षाच्या एका अंध मुलीची या चित्रपटात गोष्ट असून संजय जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

खारी नावाच्या अंध मुलीला उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहता येत नसले तरी या अंधाऱ्या जगात तिने अनेक स्वप्न आपल्या भावाच्या डोळ्याने पाहिले आहेत. भावा-बहिणीच्या नितळ आणि निरपेक्ष प्रेमाचे दर्शन या चित्रपटाच्या माध्यमातून होतो. वेदश्री खाडिलकर ही या चित्रपटाच्या टायटल रोलमध्ये आहे तर आदर्श हा बिस्किटाच्या भूमिकेत आहे. ड्रीमिंग ट्‌वेटी फोर सेव्हन आणि झी स्टुडिओने एकत्र येवून या चित्रपटाची निर्मीती केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.