“इंदू की जवानी’चा टीजर रिलीज

कियारा आडवाणीच्या आगामी “इंदू की जवानी’चा टीजर रिलीज झाला आहे. स्वतः कियारा आडवाणीनेच इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमधून हा टीजर रिलीज केला आहे. यामध्ये कियारा एका डेटिंग वेबसाईटवर स्वतःचे अकाउंट उघडण्याविषयी बोलताना दिसते आहे.

16 सप्टेंबरला या सिनेमाबाबत काही महत्त्वाची घोषणा होणार असल्याचा उल्लेखही कियाराच्या बोलण्यात येऊन गेला. “मी तर वेळेवर येईन, पण डेटसाठी तुम्ही उशीर करू नका.’ असे कियाराने या व्हिडीओबरोबर पोस्ट केलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

एखादी खाजगी गोष्ट सांगताना आपण ज्याप्रमाणे कुजबुजतो, त्याप्रमाणे कुजबुजत तिने ही रिक्‍वेस्ट प्रेक्षकांना केली आहे. त्यामुळे या सिनेमात काही खुसखुशीत किस्से घडणार आहेत, हे निश्‍चित आहे. “इंदू की जवानी’ हा तुफान कॉमेडी सिनेमा असणार आहे.

यामधील इंदू गुप्ताच्या लीड रोलमध्ये कियारा आडवाणी अशाच एका डेटिंग ऍपवर लॉग इन करते आणि जो काही गडबड गोंधळ होतो, त्याची धमाल कथा म्हणजे “इंदू की जवानी’ असेल.

बंगाली दिग्दर्शक अबीर सेनगुप्ता हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. तेंव्हा आता कियारा आडवाणीच्या नव्या सिनेमाची नवीन घोषणा काय आहे, ते बघूया.

Leave A Reply

Your email address will not be published.