मुंबई – चित्रपटरसिक ज्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत, तो अक्षय कुमार अभिनित ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट 9 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पोस्टर रिलीजपासूनच याची जोरदार चर्चा असून ‘कंचना 2’ या सुपरहिट तमिळ चित्रपटाचा हा रिमेक आहे.
आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या अक्षयचा या चित्रपटातील लूक खूप वेगळा आहे. हा चित्रपट 9 नोव्हेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होईल. या दिवाळीला तुमच्या घरी लक्ष्मीसोबतच धमाकेदार बॉम्बसुद्धा येईल, असं म्हणत अक्षयने प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. नुकतंच सोशल मीडियावर अक्षयने लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचा एक टिझर शेअर केला आहे.
लक्ष्मी बॉम्ब चित्रपटातील अक्षयच्या भूमिकेविषयी फॅन्सला फार उत्सुकता आहे. कारण तो एका ट्रान्सजेंडर भूताची भूमिका साकारत आहे. त्यामुळे अक्षयच्या लूकचीसुद्धा खूप चर्चा झाली होती. ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट 22 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र लॉकडाउन असल्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.