‘1000 Babies’चा टीझर रिलीज; नीना गुप्ता यांचा लुक पाहून व्हाल थक्क

1000 Babies | हॉटस्टारवर नवीन वेब सिरीज ‘1000 Babies’ चा टीझर रिलीज झाला आहे. ही एक सस्पेंस थ्रिलर वेबसीरिज आहे. यातील अभिनेत्री नीना गुप्ता यांचा लुक अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. यात नीना गुप्ता यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ‘1000 बेबीज’चे दिग्दर्शन नाझिम कोया यांनी केले आहे.
1000 Babiesच्या दमदार टीझरमध्ये नीना गुप्ता पांढरे केस मोकळे सोडून जीर्ण वस्त्रं परिधान केलेल्या दिसत आहे. टीझरच्या सुरुवातीला एक निर्जन जंगल दिसत आहे. काही वेळाने बाळांच्या रडण्याचे आवाज ऐकून त्या कानाला हात लावतात. पुढे हॉस्पिटलमधील नर्स बाळांना कडेवर घेऊन रहस्यमयी हालचाली करताना दिसते. शेवटी घडलेल्या घटनांचा शोध घ्यायला पोलीस त्या जंगलात येतात.
1000 Babies च्या टीझरमध्ये अभिनेत्री नीना गुप्तांचा भयानक अंदाज टीझरमध्ये बघायला मिळतो. या वेबसीरिजची रिलीज डेट अद्याप सांगण्यात आलेली नाही.
‘1000 बेबीज’ स्टार्स नीना गुप्ता यांच्यासह संजू शिवराम, राधिका राधाकृष्णन, शाजू श्रीधर, जॉय मॅथ्यू, इर्शाद अली, श्रीकांत मुरली, आदिल इब्राहिम, श्रीकांत बालचंद्रन, मनु एम लाल, दिलीप मेनन, शालू रहीम, व्हीकेपी, सिराजुद्दीन नजर, अश्विन कुमार, रहमान, डॅन डेव्हिस, नाझलिन आणि धनेश आनंद हे कलाकार दिसणार आहेत.
हेही वाचा:





