अन्‌ अक्‍कीला पहिल्या गलफ्रेंडने नाकारले

बॉलीवूडमध्ये रोजच नवनवीन अफेअर्स आणि रिलेशनशिपसह नवीन नव्या जोड्यांबाबत चर्चा रंगत असतात. कालांतराने ब्रेकअपच्याही बातम्या येत असतात. अशात पहिल्या प्रेमाची गोष्ट निघाली तर प्रत्येक चाहता त्यांच्या आवडत्या कलाकाराच्या पहिल्या प्रेमाची कथा ऐकायला आणि जाणून घ्यायला उत्सुक असतो. आता सध्या चर्चा रंगत आहे ती म्हणजे अक्‍की अर्थात अभिनेता अक्षयकुमारच्या पहिल्या प्रेमाची. अक्षयला त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडने चक्‍क नकार दिला होता. किंबहुना त्याला कारणदेखील तसेच होते.

आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल खुद्द अक्षयने खुलासा केला आहे. त्यावेळी अक्षय हा खूपच लाजाळू स्वभावाचा होता. यामुळे पहिली गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली. दरम्यान, विनोदवीर कपिल शर्माच्या चॅट शोमध्ये अक्षयला त्याच्या पहिल्या प्रेमाची आठवण आली. “हाउसफुल्ल 4′ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अक्षयने त्याची पहिली डेट आणि गर्लफ्रेंडबद्दल वक्‍तव्य केले.

तो म्हणाला, मी तिच्यासोबत जवळपास चारवेळा डेटवर गेलो, हॉटेलमध्ये देखील गेलो होतो. मात्र त्यानंतर तिने लगेच मला रिजेक्‍ट केले. सध्या अक्षयचा हा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास काही दिवसांपूर्वी अक्षयचा “लक्ष्मी’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. “लक्ष्मी’ चित्रपटाच्या माध्यामातून त्याने डिजिटल माध्यमांत पदार्पण केले. तसेच तो आगामी “सूर्यवंशी’, “बच्चन पांडे’, “पृथ्वीराज’, “अतरंगी रे’, “बेलबॉटम’ या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.