Dainik Prabhat
Wednesday, August 17, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

#IREvIND 2nd T20I : भारताचा आयर्लंडला व्हाइटवॉश; दुसऱ्या सामन्यात निसटता विजय

द्विशतकी धावांनंतरही आयर्लंडने फोडला होता घाम

by प्रभात वृत्तसेवा
June 29, 2022 | 5:08 pm
A A
#IREvIND 2nd T20I : भारताचा आयर्लंडला व्हाइटवॉश; दुसऱ्या सामन्यात निसटता विजय

डब्लिन – भारताने टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसराही सामना जिंकत मालिकाही जिंकली. या लढतीत भारताने द्विशतकी धावसंख्या उभारुनही आयर्लंडच्या फलंदाजांनी दिलेल्या अविश्‍वसनीय कामगिरी केली मात्र, त्यांचा अनुभव कमी पडला व भारताचा अवघ्या चार धावांनी विजय मिळवला.

– दोन्ही सामने भारताने जिंकले
– भारताचा आयर्लंडला व्हाइटवॉश
– दीपक हुडाची शतकी खेळी
– सॅमसनचेही वादळी अर्धशतक
– दीपक हुडा सामन्यासह मालिकेचाही मानकरी

भारताचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर ईशान किशनने निराशा केली. मात्र, संजू सॅमसन व जीरक हुडा यांनी दीडशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. हुडाने वादळी फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केले तर सॅमसननेही आक्रमक खेळ करत अर्धशतकी पल्ला पार केला. भरात आलेला सॅमसन 77 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 42 चेंडूंचा सामना करताना 9 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली.

तो बाद झाल्यावर मात्र, सूर्यकुमार यादव 15 व कर्णधार हार्दिक पंड्याने नाबाद 13 धावा करत हुडाला सुरेख साथ दिली. हुडाने आपले शतक थाटात पूर्ण केले. 104 धावांच्या या खेळीत हुडाने 57 चेंडूत 9 चौकार व 6 षटकारांची फचकेबाजी केली. या कामगिरीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 225 असा धावांचा डोंगर उभा केला. मार्क अडेरने 3 तर, जोश लिटील व क्रेग यंग यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

भारताने विजयासाठी दिलेले 226 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडने अखेरपर्यंत अफलातून लढत दिली. सलामीवीर पॉल स्टर्लिंग आणि कर्णधार अँड्रयू बालबर्नी यांनी संघाला 70 धावांची सलामी दिली. स्टर्लिंग 40 धावा करून बाद झाला तर लगेचच गॅरेथ डेलानीनेही निराशा केली. कर्णधार बालबर्नीने आपले अर्धशतक पूर्ण केले. हॅरी टेक्‍टरने 28 चेंडूत 39 धावांची आक्रमक खेळी करत भारतीय गोटात चिंता निर्माण केली. जॉर्ज डॉकरेलने नाबाद 34 आणि मार्क अडेर नाबाद 23 यांनीअफलातून फटकेबाजी करत आयर्लंडला विजयाच्या जवळ नेले.

यावेळी अखेरचे षटक टाकण्यासाठी नवोदित व केवळ दुसराच सामना खेळत असलेला वेगवान गोलंदाज उमरान मलिककडे चेंडू सोपवला. उमरानने पंड्याचा विश्‍वास सार्थ ठरवला व संघाचा विजय साकार केला. अखेरच्या षटकांत आयर्लंडला 6 चेंडूत 17 धावांची गरज होती. मात्र, त्यांचा अनुभव कमी पडला तसेच उमरानने भेदक गोलंदाजी केली व आयर्लंडच्या फलंदाजांना मोठे फटके खेळू दिले नाहीत. भारताने गोलंदाजी करताना 20 अवांतर धावा दिल्याने सामना अखेरच्या षटकापर्यंत खेचला गेला. या सामन्यासह भारताने दोन सामन्यांची ही मालिका 2-0 अशी जिंकली. यंदाच्या मोसमात भारताचा हा सलग पाचवा व्हाईट वॉश विजय ठरला आहे.

हुडाचे अफलातून शतक

भारताचा नवोदित फलंदाज दीपक हुडा याने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शतक फटकावले व टी-20 क्रिकेटमधील आपले पहिले शतक साकार केले. हिटमॅन रोहित शर्मा, लोकेश राहुल व सुरेश रैनानंतरचा चौथा फलंदाज ठरला आहे. रोहितने टी-20 क्रिकेटमध्ये 4, राहुलने 2 तर रैनाने एक शतक फटकावले आहे.

संक्षिप्त धावफलक –

भारत – 20 षटकांत 7 बाद 225 धावा. (दीपक हुडा 104, संजू सॅमसन 77, अवांतर 20, मार्क अडेर 3-42, जोश लिटील 2-38, क्रेग यंग 2-35). आयर्लंड – 20 षटकांत 5 बाद 221 धावा. (अँड्रयू बालबर्नी 60, पॉल स्टर्लिंग 40, हॅरी टेक्‍टर 39, जॉर्ज डॉकरेल नाबाद 34, मार्क अडेर नाबाद 23, रवी बिष्णोई 1-41, उमरान मलिक 1-42, भुवनेश्वर कुमार 1-46, हर्षल पटेल 1-54).

 

Tags: #IREvIND T20I series#TeamIndiatwo-matchWin

शिफारस केलेल्या बातम्या

अमित ठाकरे म्हणाले,”मनसैनिकांनो! कामाला लागा, प्रत्येक निवडणूक…”
महाराष्ट्र

अमित ठाकरे म्हणाले,”मनसैनिकांनो! कामाला लागा, प्रत्येक निवडणूक…”

2 weeks ago
ऑस्ट्रेलियाच टी-20 विश्‍वचषक जिंकणार; माजी क्रिकेटपटूने केले भाकित
क्रीडा

ऑस्ट्रेलियाच टी-20 विश्‍वचषक जिंकणार; माजी क्रिकेटपटूने केले भाकित

3 weeks ago
#WIvIND 1st ODI |  वेस्ट इंडिजचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या… दोन्ही संघाची प्लेइंग-11
क्रीडा

#WIvIND 1st ODI | वेस्ट इंडिजचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या… दोन्ही संघाची प्लेइंग-11

4 weeks ago
#ENGvIND 2nd ODI : लॉर्डसवर इतिहास बदलण्याची भारताला संधी
क्रीडा

#ENGvIND 2nd ODI : लॉर्डसवर इतिहास बदलण्याची भारताला संधी

1 month ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Gold-Silver Rates : सोने व चांदीच्या दरात घसरण चालूच; आगामी काळामध्ये…

आता पाकिस्तानमध्ये सैन्य पाठवण्याची चीनची तयारी

Stock Market : सलग चौथ्या दिवशी शेअर निर्देशांकात वाढ; सेन्सेक्‍स पुन्हा…

Ultimate Kho Kho 2022 : गुजरात जायंट्‌सचा सलग दुसरा विजय

“महिलांचा आदर करण्याबद्दल तुम्ही जे बोललात…” बिल्कीस बानो प्रकरणी तेलंगणाच्या मंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

ईडीने फास आवळला : कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुकेशसोबत जॅकलीन फर्नांडिसही आरोपी

भंडारा : जिल्ह्यात 42 निवारागृहांत 3 हजाराहून अधिक पूरग्रस्तांची प्रशासनाकडून व्यवस्था

द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने महिला सबलीकरणाचा गौरव – मुख्यमंत्री शिंदे

Rain Update : पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १८ तर भंडारा जिल्ह्यातील ७८ रस्ते वाहतुकीकरिता बंद

“पत्नीची दुसऱ्या महिलेशी तुलना करणे हे…” कोलकाता हायकोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी

Most Popular Today

Tags: #IREvIND T20I series#TeamIndiatwo-matchWin

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!