#INDvAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून विजय

हैदराबाद – केदार जाधव आणि एम.एस.धोनी यांच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात 6 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्याच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

विजयासाठीचे 237 धावांचे आव्हान भारतीय संघाने 48.2 षटकांत  4 बाद 240 धावा करत पूर्ण केले. भारतीय संघाची सुरूवात खराब झाली, भारताचा सलामीवीर शिखर धवन शून्यावर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने 37 आणि विराट कोहलीने 44 धावा करत भारताचा डाव सावरला. त्यानंतर आलेल्या एम. एस. धोनी याने नाबाद 59 आणि केदार जाधवने नाबाद 81 धावांची खेळी करत भारतीय संघाला विजय प्राप्त करून दिला.

दरम्यान ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी 237 धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाच्या संघाला 50 षटकांत 7 बाद 237 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली.

ऑस्ट्रेलिया संघाची सुरूवात खराब झाली, त्याचा सलामीवीर रोनफिंच हा शून्यावर बाद होऊन तबूंत परतला. त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि मार्कस स्टोइनिस यांनी डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी 87 धावांची भागिदारी रचली. उस्मान ख्वाजा 50 तर मार्कस स्टोइनिस हा 37 धावावर बाद झाला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने 40 धावा करत संघाची धावसंख्या 150 पार नेली. त्यानंतर नाथन कुल्टर-नाइलच्या 28 आणि एलेक्स कैरीच्या नाबाद 36 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 236 पर्यंत मजल मारली.

भारताकडून मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर केदार जाधवने 1 विकेट मिळाली. रविंद्र जडेजाला एकही गडी बाद करता आला नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.