मेलबर्न – भारतीय संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र, त्याची ठिकाणे निश्चित झाली नव्हती. बुधवारी मंडळाने ठिकाणे व संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे.
एकदिवसीय मालिकेने या दौऱ्याला सुरुवात होत असून कसोटी मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटी परंपरेप्रमाणे मेलबर्नलाच होणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यात 3 एकदिवसीय, 3 टी-20 तर 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
प्रेक्षकांना प्रवेश मिळण्याची शक्यता
भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार असल्याचे संकेत ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने दिले आहेत. हा सामना मेलबर्नच्या मैदानावर होणार असून त्यासाठी 25 हजार प्रेक्षकांना प्रवेश देता येईल का, याची चाचपणी मंडळ करणार आहे. अर्थात, करोनाबाबतचे सर्व नियम प्रेक्षकांना पाळावे लागणार आहेत.
मालिकेचे वेळापत्रक…
एकदिवसीय मालिका
पहिला एकदिवसीय सामना – 27 नोव्हेंबर, सिडनी
दुसरा एकदिवसीय सामना – 29 नोव्हेंबर, सिडनी
तिसरा एकदिवसीय सामना – 2 डिसेंबर, मनुका ओव्हल
टी-20 मालिका
पहिली टी-20 – 4 डिसेंबर, मनुका ओव्हल
दुसरी टी-20 – 6 डिसेंबर, सिडनी
तिसरी टी-20 – 8 डिसेंबर, सिडनी
सराव सामने
6 ते 8 डिसेंबर – पहिला सराव सामना सिडनी
11-13 डिसेंबर – दुसरा सराव सामना (दिवस-रात्र) सिडनी
कसोटी मालिका
पहिली कसोटी – 17 ते 21 डिसेंबर एडिलेड
दुसरी कसोटी – 26 ते 30 डिसेंबर मेलबर्न
तिसरी कसोटी – 7 ते 11 जानेवारी 2021 सिडनी
चौथी कसोटी – 15 ते 19 जानेवारी 2021 गाबा