अहमदाबाद – भारताच्या एकदिवसीय संघाची निवड होण्यापूर्वी खेळाडूंची तंदुरुस्ती तसेच करोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी एकदिवसीय संघाच्या संभाव्य खेळाडूंना अहमदाबादमध्ये येत्या 1 मार्चपूर्वी दाखल होण्याची सूचना बीसीसीआयने केली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका संपूर्णपणे पुण्यात होणार असली तरीही संघ निवड खेळाडूची तंदुरुस्ती पाहून तसेच त्यांचा करोनाचा अहवाल आल्यावर येथेच करण्यात येणार आहे.