मुंबई : मुंबईचा अव्वल फलंदाज पृथ्वी शाॅ याला दुखापतीमुळे आगामी भारत ‘अ’ संघाच्या न्यूझीलंड दौ-यावरील पहिल्या दोन सराव सामन्यांतून बाहेर पडावे लागले आहे. भारत येत्या काही दिवसांत न्यूझीलंडला रवाना होणार आहे. या दौ-यावरील वन-डे आणि चार दिवसीय लढतींमधील त्याच्या सहभागाचा निर्णय काही दिवसांत घेण्यात येणार आहे.
A shoulder injury has ruled @PrithviShaw out of India A’s two upcoming practice games in New Zealand.
Wishing you a speedy recovery, Prithvi!#ThisIsNewDelhi #DelhiCapitals pic.twitter.com/yNKmtj7cni
— Delhi Capitals (@DelhiCapitals) January 7, 2020
रणजी करंडक स्पर्धेतील कर्नाटकविरूध्द सामन्यात पृथ्वीला क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे दुसर्या डावात तो फलंदाजीस उतरला नव्हता. या सामन्यात कर्नाटक संघाने मुंबईला अडीच दिवसांतच ५ विकेटने हरवले होते.
पृथ्वीला सध्या बेंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) उपचारांसाठी पाठविण्यात आले आहे.