वाघोली (पुणे) – संघभावना ही खेळ व खेळाडूंचा
आत्मा आहे. विचारांचे संघटन करण्यासाठी खेळ खूप उपयुक्त आहेत. संघ भावना वाढून मिळणारा आनंद हा वेगळा असतो .व्यायामाची जोड, आपलेपणाची भावना वाढीस लागण्यासाठी खेळ महत्वाचे आहेत. यासाठी सर्वांनी खेळ खेळावेत. पाठबळ व व प्रोत्साहन ही खेळाडूंची खरी बक्षिसे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते तथा वाघोली चे माजी उपसरपंच शांताराम कटके यांनी केले.
शांताराम बापू कटके मित्र परिवाराच्या वतीने आयोजित ग्रँड क्रिकेटिंग इव्हेंट व्हॅलेंटाइन 2021 या क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी माजी उपसरपंच शांताराम कटके बोलत होते. या क्रिकेट स्पर्धेत जवळपास वाघोली मधील गृहनिर्माण संस्थेतील तीस संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या पाचव्या वर्षी चा मानकरी होण्याचा बहुमान तथा प्रथम क्रमांक आय व्ही यॉर्कर या संघाने पटकाविला .यावेळी अनुक्रमे द्वितीय ते चतुर्थ क्रमांक डी ओ सी, न्यू ओ रॉक स्टार,उमंग प्रीमियर संघांनी पटकाविले.
यावेळी सामनावीर म्हणून घनश्याम शर्मा, उत्कृष्ट फलंदाजाचा मान सुनील गाडे,उत्कृष्ट गोलंदाजाचा मान नरेंद्र चौधरी, तर उत्कृष्ट यष्टिरक्षक म्हणून अंकुश अहिरराव यांनी नेत्रदीपक यश मिळवले. अनंत ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सोमनाथ आव्हाळे, महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चाचे कार्यकारणी सदस्य गणेश कुटे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भाडळे, गणेश हरगुडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेच्या आयोजनासाठी सोमनाथ आव्हाळे, अमोल शीवांगी,शंकर खापने,सुहास इनामदार, अबिद शेख,गणेश हरगुडे, विक्रम वाघमारे, ऋषिकेश गावडे, विजय भागवत, सोमनाथ कटके, आदिनाथ गाडे, अरविंद शेळके,दर्पण लाला, मुकेश चोभे ,युवराज कटके,
अक्षय गाडे,गणेश जाधव आदींनी परिश्रम घेतले.