टीम इंडियाकडून प्रजासत्ताकदिनाची भेट! न्यूझीलंडवर ९० धावांनी विजय

न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने आज न्यूझीलंड विरुद्ध सुरु एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत सलग दुसरा विजय नोंदवला. प्रजासत्ताकदिनानिम्मित्त आज भारतामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण असून भारतीय संघाच्या या मोठ्या विजयामुळे प्रजासत्ताकदिनाचा आनंद द्विगुणित झाला आहे.

भारताने आजच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करण्याच्या कर्णधार कोहलीच्या निर्णयाला भारतीय फलंदाजांनी योग्य ठरवत निर्धारित ५० षटकांमध्ये ३२४ धावांचे आव्हान न्यूझीलंड समोर ठेवले. भारतातर्फे सलामीवीर रोहित शर्मा (८७), आणि शिखर धवन ६६ यांनी चांगली सुरुवात करून दिली. यानंतर अंबाती रायडू ४७, विराट कोहली ४३, महेंद्रसिंह धोनी ४८ आणि केदार जाधव २२ यांच्या खेळीमुळे भारताला ३२४ एवढे विशाल आव्हान उभारता आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विजयासाठी ३२५ धावांचे लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलेल्या किवी संघाचे फलंदाज मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे फार काळ टिकू शकले नाहीत. डी ब्रेसवेल याचे अर्धशतक सोडल्यास न्यूझीलंडचा एकही खेळाडू मोठी खेळी करू शकला नाही. शेवट न्यूझीलंडचा संघ ४० पूर्णांक २ षटकांमध्ये २३४ धावांवर गारद झाल्याने भारताने न्यूझीलंडवर ९० धावांनी मात केली. भारतातर्फे कुलदीप यादवने सर्वाधिक ४ बळी घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)