नवी दिल्ली – टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिंकू सिंगच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. क्रिकेटर रिंकू सिंग उत्तर प्रदेशातील मच्छलीशहरच्या खासदार प्रिया सरोजसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. प्रिया सरोज या समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. त्यांची एंगेजमेंट झाल्याचेही सांगण्यात येत आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी रिंक सिंगची भारतीय संघात निवड झाली आहे. ही मालिका 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
मछली शहर की सांसद प्रिया सरोज के साथ हुआ क्रिकेटर रिंकू सिंह का रोका।
— Abhishek Tripathi / अभिषेक त्रिपाठी (@abhishereporter) January 17, 2025
रिंकू सिंगची मंगेतर प्रिया वयाच्या 25 व्या वर्षी खासदार बनल्या आहेत. प्रिया सरोज या सुप्रीम कोर्टात वकीलही आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. प्रिया सरोज यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप नेते बीपी सरोज यांचा पराभव केला होता. प्रियाचे वडील तुफानी सरोज हे देखील राजकारणात आहेत. ते मच्छिलिशहर लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा (1999, 2004 आणि 2009) खासदार राहिले आहेत. प्रिया सरोजचा जन्म 23 नोव्हेंबर 1998 रोजी झाला आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत प्रिया सरोजना संधी दिली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रिंकूची कामगिरी –
रिंकू सिंगबद्दल सांगायचे तर, त्याने त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत 2 वनडे सामने खेळले आहेत. या काळात त्याने 2 डावात 27.50 च्या सरासरीने आणि 134.14 च्या स्ट्राईक रेटने 55 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या 38 आहे. इतकेच नाही तर रिंकूने त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत 30 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
या काळात या तुफानी फलंदाजाने 22 डावात 507 धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये त्याची सरासरी 46.09 आणि स्ट्राइक रेट 165.14 आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याने आतापर्यंत 3 अर्धशतके झळकावली आहेत. या काळात त्याची सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे नाबाद 69 धावा.
रिंकू सिंग 22 जानेवारीपासून खेळताना दिसणार –
रिंकू सिंग लवकरच इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत खेळताना दिसणार आहे. ही मालिका 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या कालावधीत भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातील.
भारत विरुद्ध इंग्लंड टी20 मालिकेचे वेळापत्रक –
पहिला T20: 22 जानेवारी – ईडन गार्डन, कोलकाता
दुसरी T20: 25 जानेवारी – एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
तिसरा T20: 28 जानेवारी – सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट
चौथा T20: 31 जानेवारी- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
पाचवा T20: 2 फेब्रुवारी- वानखेडे स्टेडियम, मुंबई