मुंबई – टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जाणारा “इरफान पठाण” लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यावर आता इरफान चित्रपट क्षेत्रात एन्ट्री करत आहे.
मात्र, इरफान हिंदीत नाही, तर तमिळ चित्रपटात डेब्यू करणार आहे. ‘कोब्रा’ या चित्रपटातून इरफान आपल्या फॅन्सला भेटणार आहे. आपल्या 36व्या वाढदिवशी इरफानने या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली.
— Irfan Pathan (@IrfanPathan) October 27, 2020
नुकतंच कोब्रा या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला असून, यात इरफान फ्रेंच इंटरपोल अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे.
या चित्रपटाचे शुटींग भारतात तसेच परदेशात केले जात आहे. कोब्रा चित्रपटाला ए.आर. रेहमान यांचे संगीत असून हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे.
चित्रपटामध्ये काम करणारा इरफान पठाण पहिला खेळाडू नसून या अगोदर बऱ्याच खेळाडूनी चित्रपट सृष्टीमध्ये आपले नशीब अजमावले आहे.