चॅम्पियन्स ट्रॅाफी 2025 ला 19 फेब्रवारीपासून सुरूवात होणार आहे. या टूर्लामेंन्टचा पहिला सामना भारत विरुद्ध बांग्लादेश असणार आहे. त्या आधी सोशल मीडियावर टीम इंडियाच्या जर्सीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. नुकतेच टीम इंडियातील प्लेअरचे फोटो शूट पार पडले असून त्याचे फोटो बीसीसीआयने त्यांच्या एक्स या अधिकृत अकाउंटवरून शेअर केले आहेत.
टीम इंडियाच्या न्यू जर्सीचा रंग आणि डिझायन सर्वांसमोर आला असून टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नावे लिहिले आहे. या चॅम्पियन्स ट्रॅाफीचे यजमान पद हे पाकिस्तानकडे आहे. यामुळे जर्सीवर पाकिस्तानचे नाव लिहिण्यात आले आहे.
टीम इंडियाच्या 15 खेळाडूंनी नवीन जर्सीमध्ये फोटोशूट केले. हे सर्व तेच खेळाडू आहेत, ज्यांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नव्या जर्सीतील टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यंदा पाकिस्तान हा चॅम्पियन्स ट्रॉफीचा यजमान असून भारताचे सर्व सामने दुबईतच खेळवले जाणार आहेत.19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेला सुरूवात होणार आहे.
निळा रंग टीम इंडियाची ओळख
आयसीसीयाच्या इव्हेंटमध्ये टीम इंडियाच्या जर्सीवर टूर्नामेंन्टच्या लोगोसोबतच यजमान देशाचे नावही लिहिण्यात आले आहे. यंदा पाकिस्तानकडे यजमान पद असल्याने इतर आठही संघांच्या जर्सीवर पाकिस्तान संघाचे नाव आहे. टीम इंडियाच्या जर्सीवर मोठ्या अक्षरात INDIA असे लिहिण्यात आले आहे. ही जर्सी निळ्या रंगाची असून जी वर्षानुवर्षे भारतीय संघाची ओळख बनली आहे.
प्रमुख दावेदार टीम इंडियाच, पण….
19 फेब्रुवारापासून चॅम्पियन्स ट्रॅाफी 2025 चा रणसंग्राम रंगणार आहे. 20 फेब्रुवारीला दुबईत भारत विरुद्ध बांग्लादेश पहिला सामन्याचा थरार रंगणार आहे. त्यानंतर २३ फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान आणि २ मार्चला भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना खेळला जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडिया आणि बांग्लादेश परस्पराविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. टीम इंडियाने हा सामना सहजतेने घेऊ नये, याचे कारण म्हणजे बांग्लादेशची टीम सुद्धा उलफेर घडवू शकते. भारत विरुद्ध बांग्लादेश हा या स्पर्धेतील पहिला ओपनिंग सामना असणार आहे. चॅम्पियन्स ट्रॅाफीसाठी टीम इंडिया प्रमुख दावेदार मानली जात आहे. पण याआधीच्या अनेक मॅचमध्ये बांग्लादेशाच्या टीमने भारतीय संघाला मोठी टक्कर दिल्याचे पाहिला मिळाले आहे.
These pics from today 📸
How good 🤌🏻#TeamIndia | #ChampionsTrophy pic.twitter.com/yM50ArMIj5— BCCI (@BCCI) February 17, 2025
हे प्लेअर टीम इंडियाची डोकदुखी वाढवू शकतात
बांग्लादेशचा स्टार बॉलर मुस्तफिजुर रहमान टीम इंडियासमोर तगडं आव्हान निर्माण करु शकतो. महमुदुल्लाह बांग्लादेशचा अनुभवी खेळाडू असून आक्रमक पद्धतीने बॅटिंग करण्यासाठी त्याला ओळखले जाते. बांग्लादेशसाठी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याने 10 हजारपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तस्कीन अहमद टीम इंडिया विरुद्ध अनेक सामने खेळला आहे. भारताविरुद्ध 7 वनडे सामन्यात त्याने 14 विकेट घेतल्या आहेत. मुशफिकुर रहीम हा बांग्लादेश टीमसाठी उत्कुष्ट फलंदाजी करत आला आहे. त्याने विकेटकीपिंमध्ये देखील महत्वाची भूमिका बजावलेली आहे. 27 वर्षांच्या मेहदी हसन मिराज हा अॅालराऊंडर प्लेअर आहे. भारत दौऱ्यावर आपल्या खेळाने त्याने भारतीय खेळाडूंना हैराण केले होते.