मेलबर्न – सलामीवीर एलिसा हिली आणि बेथ मूनी यांच्या खणखणीत अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने आयसीसी टी-20 महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात भारतीय संघासमोर विजयासाठी 185 धावांचं आव्हान ठेवले आहे.
Huge wicket!
Shafali Verma – India’s leading run-scorer this #T20WorldCup – goes for 2!
SCORE ? https://t.co/fEHpcnTek4 pic.twitter.com/h42jLKDs0I
— T20 World Cup (@T20WorldCup) March 8, 2020
प्रत्युत्तरात भारतीय संघाने फलंदाजीस सुरूवात केली असून भारताची सलामीची धडाकेबाद फलंदाज शफाली वर्मा सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर बाद झाली आहे. तिने 3 चेंडूत 2 धावा काढल्या. शफालीला मेगन शूटने एलिसा हिलीकरवी झेलबाद केले.
Verma: ☝️
Bhatia: retired hurt
Rodrigues: ☝️Just two overs into the chase and plenty of concerns for India. #T20WorldCup | #FILLTHEMCG
SCORE ? https://t.co/6rmqx18Wfz pic.twitter.com/5diLoxPwaP
— ICC (@ICC) March 8, 2020
तिच्या पाठोपाठ फलंदाजीस आलेली जेमिमा राॅड्रिग्स ही सुध्दा शून्यावर बाद झाली आहे. तिला जेस जोनासेन हिने निकोला कैरीकरवी झेलबाद केले. जेमिमा बाद झाली तेव्हा भारताच्या 2 षटकांत 2 बाद 8 धावा झाल्या आहेत. तर भारताची यष्टिरक्षक फलंदाज ही डोक्याला चेंडू लागल्याने रिटायर्ट हर्ट झाली आहे.