पहिल्या वनडेसाठी टीम इंडिया चेन्नईत; कोहलीने शेअर केला फोटो

चेन्नई : भारत आणि वेस्टइंडिजचे संघ चिंदबरम स्टेडियममध्ये होणा-या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यासाठी गुरूवारी चेन्नईत पोहचले आहेत. त्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांच्या सोबतचा आपला फोटो ट्विटरवर शेअर केला आहे आणि “चेन्नईत पोहचलो” असं कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, भारतीय संघ तीन टी-२० सामन्याची मालिका २-१ ने जिंकल्यानंतर आता तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे, आणि १५ डिसेंबर रोजी पहिला सामना खेळण्यासाठी चेन्नईत दाखल झाली आहे. मालिकेतील दुसरा सामना १८ डिसेंबरला विशाखापट्टनम येथे तर तिसरा सामना २२ डिसेंबर रोजी कटक येथे होणार आहे.

या मालिकेत सलामीवीर मयंक अगरवालला शिखर धवन ऐवजी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. धवनला सईद मुश्ताक अली ट्राफीत दुखापत झाली होती आणि अद्याप तो दुखापतीतून सावरलेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.