आॅकलंड : आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरूवात झाली आहे. मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यास आॅकलंड येथील ईडन पार्क मैदानावर सुरूवात झाली आहे. तत्पूर्वी, भारतीय कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना न्यूझीलंड संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केले आहे.
शिखर धवन, हार्दिक पांड्या, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार हे खेळाडू दुखापतीमुळे या दौ-यावर नाहीत. त्यामुळे आजच्या सामन्यात युजवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांना संघात स्थान देण्यात आले आहे. संघाचा यष्टीरक्षक म्हणून लोकेश राहुल जबाबदारी संभाळणार आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा, के एल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, युज़वेंद्र चहल, मोहम्मद शमी.
1st T20I. India XI: R Sharma, KL Rahul, V Kohli, S Iyer, M Pandey, S Dube, R Jadeja, S Thakur, J Bumrah, Y Chahal, M Shami https://t.co/5NdtfFsdlA #NZvInd
— BCCI (@BCCI) January 24, 2020
दुसरीकडे न्यूझीलंड संघाचे प्रमुख खेळाडू ट्रेंट बोल्ट, लाॅकी फर्ग्युसन, मॅट हेनरी आणि जिमी निशम हे दुखापतूमुळं संघाच्या बाहेर आहेत. त्यामुळे त्याच्या जागी राखीव खेळाडूंना संधी मिळाली आहे.
न्यूझीलंड संघ : मार्टिन गप्टिल, कॉलिन मुनरो, केन विलियमसन, टिम सीफ़र्ट, रॉस टेलर, कॉलिन डी ग्रैंडहोम, मिचेल सैंटनर, टिम साउदी, ईश सोढ़ी, ब्लेयर टिकनर, हेमिश बेनेट
1st T20I. New Zealand XI: M Guptill, C Munro, K Williamson, T Seifert, R Taylor, C de Grandhomme, M Santner, T Southee, I Sodhi, B Tickner, H Bennett https://t.co/5NdtfFsdlA #NZvInd
— BCCI (@BCCI) January 24, 2020
दरम्यान, सध्या टी-२० च्या क्रमवारीत भारत पाचव्या तर न्यूझीलंड सहाव्या स्थानी आहे. या दोन्ही संघात आतापर्यंत ११ टी-२० सामने झाले असून यात ८ वेळा न्यूझीलंडने तर ३ वेळा भारताने विजय मिळविला आहे.