विराट कोहली ‘या’ बाबतीत ठरला पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा सरस

जगभरातील अव्वल इन्स्टाग्रामच्या प्रभावशाली व्यक्तीची यादी जाहीर

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि चित्रपट अभिनेत्री अनुष्का शर्मा या जोडीने तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक इन्स्टाग्रामच्या प्रभावशाली ( top Instagram influencers worldwide ) व्यक्तीच्या यादीत टॉप 25 मध्ये स्थान मिळविले आहे.

ही यादी जागतिक डेटा संग्रहण आणि विश्‍लेषण करणारे व्यासपीठ (प्लॅटफॉर्म) हाइप ऑडिटरने  ( Hype Auditor ) जाहीर केली आहे. जगभरातील लोकांना प्रभावित करणाऱ्या सेलेब्सच्या यादीत विराट कोहली ( Virat kohli ) 11 व्या स्थानी पोहचला आहे. यासह, तो या यादीत सर्वोच्च स्थानी पोहचणारा पहिलाच भारतीय बनला आहे.

विराट कोहलीने 11 वे स्थान मिळवित भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  ( PM Narendra Modi ) यांना पिछाडीवर टाकले आहे. पंतप्रधान मोदी 17 व्या स्थानवर आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री व विराटची पत्नी अनुष्का शर्मा ( Anushka Sharma )हिने देखील या यादीत 24 वे स्थान मिळविले आहे.

या यादीमध्ये पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो अव्वल स्थानी आहे. दुसरीकडे कॅटरिना कैफ आणि दीपिका पादुकोण यांनी देखील जागतिक इन्स्टाग्रामच्या प्रभावशाली व्यक्तीच्या (ग्लोबल इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर) यादीमध्ये टॉप 50 मध्ये स्थान मिळवले आहे. या यादीत कॅटरिना 43 व्या आणि दीपिका 47 व्या स्थानावर आहे.

या यादीसाठी 1000 सेलिब्रिटींच्या इन्स्टाग्राम अकाउंटला त्यांच्या ऑडियंसच्या क्वालिटी आणि ऑथेंटिक इंगेजमेंटच्या आधारे क्रमवारी करण्यात आली. हे सेलिब्रेटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मदतीने त्यांच्या संवादातून जागरूकता, सशक्तीकरण, प्रेरणा देण्यासाठी किती सक्षम आहेत हे पाहिले गेले. तसेच सोशल मीडियावर त्याची उपस्थिती आणि त्याला कसा व किती प्रतिसाद आहे, हे देखील पाहिले गेले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.