हरियाणा- लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यामध्ये सात राज्यांमधील 59 जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्या पासून या मतदानाला जोरदार सुरुवात झाली आहे. सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सर्व 7 आणि हरियाणामधील सर्व 10 जागांशिवाय उत्तरप्रदेशातील 14, बिहार, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8-8 तर झारखंडमधील 4 जागांवर मतदान होत आहे.
Haryana: Team India Captain Virat Kohli after casting his vote at a polling booth in Pinecrest School in Gurugram pic.twitter.com/z3vzJvxWSp
— ANI (@ANI) May 12, 2019
आज सकाळीच गुरूग्राममधील पाइनक्रिस्ट स्कूलमध्ये भारीय क्रिकेट टीमचा कर्णधार ‘विराट कोहली’ याने देखील मतदान केंद्रात आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. विराटने यावेळे इतरांना देखील मतदान करण्याचे आव्हान केले आहे. हरियाणा मध्ये आज 10 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे अनेक दिग्ज नेत्यांचे भविष्य आज एव्हीएम मशीन मध्ये बंद होणार आहे.