ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडिया आता इंग्लंड विरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाने टी 20 संघाची घोषणा केली होती, त्यानंतर आज वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडविरूद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा सारखाच संघ जाहीर करण्यात आला आहे.
मोहम्मद शमीचे पुनरागमन
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी शेवटचा 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाकडून खेळताना दिसला होता. दुखापतीमुळे शमी बराच काळ भारतीय संघाबाहेर होता. यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन केले आहे. टीमने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मोहम्मद शमीची निवड केली आहे.
इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उप कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत , जडेजा, हर्षित राणा
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.
टी-ट्वेंटी मालिकेसाठी टीम इंडिया
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (व्हाईस कॅप्टन), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).
भारत आणि इंग्लंड टी-20 मालिकेचे वेळापत्रक
22 जानेवारी – पहिला T20 सामना, कोलकाता
25 जानेवारी – दुसरा T20 सामना, चेन्नई
28 जानेवारी – तिसरा T20 सामना, राजकोट
31 जानेवारी – चौथा T20 सामना, पुणे
2 फेब्रुवारी – पाचवा T20 सामना, मुंबई