बीसीसीआयकडून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने ही घोषणा केली आहे. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना 9 मार्च रोजी पार पडेल. 19 फेब्रुवारीला चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानं आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. त्यानंतर 23 फेब्रुवारीला दुबईच्या मैदानावर भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना पार पडेल. त्यानंतर भारतीय संघ 2 मार्चला न्यूझीलंडशी भिडणार आहे. या संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे असणार आहे.
‘या’ खेळाडूचे झाले कमबॅक
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघामध्ये श्रेयस अय्यरला स्थान देण्यात आले आहे. तो मागच्या काही महिन्यांपासून टीममधून बाहेर होता. मात्र आता तो चॅम्पियन्स ट्रॉफीद्वारे टीम इंडियात कमबॅक करताना दिसणार आहे. या संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे असणार आहे तर उपकर्णधारपदाची धुरा शुभमन गिलकडे देण्यात आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया (Champions Trophy 2025 India squad)
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.
ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संपूर्ण वेळापत्रक….
19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (नॅशनल स्टेडियम, कराची)
20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई)
21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (नॅशनल स्टेडियम, कराची)
22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (गद्दाफी स्टेडियम, लाहोर)
23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई)
24 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड (रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी)
25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी)
26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड (गद्दाफी स्टेडियम, लाहोर)
27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी)
28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (गद्दाफी स्टेडियम, लाहोर)
01 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड (नॅशनल स्टेडियम, कराची)
02 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई)
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी गटविभागणी –
अ गट- पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांग्लादेश.
ब गट- दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड.