पत्नी पळून गेल्याने मुलींसह शिक्षकाची आत्महत्या

चंद्रपूर – पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने दोन चिमुकल्या मुलींना गळफास लावून पतीने स्वतः आत्महत्या केली. या संपूर्ण घटनेमुळे संपूर्ण जिल्हयात परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बल्लारपुर इथे राहणारे श्रीकांत कदुपल्ली हे शिक्षक आहेत. त्यांची पत्नी आणि 2 मुली असे त्यांचे कुटुंब आहे. श्रीकांत यांच्या पत्नीचे एक वाहनचालकसोबत प्रेमप्रकरण होते. गेल्या आठ दिवसांआधी श्रीकांत यांच्या पत्नी वाहनचालकासोबत पळून गेली. त्यामुळे श्रीकांत एकटे पडले. त्यांना या सगळ्याचा मानसिक धक्का बसला.

या घटनेने व्यथीत झालेल्या श्रीकांत यांनी दोन्ही मुलींना गळफास लावत स्वत:हा आत्महत्या केली. सगळ्यात धक्कादायक म्हणजे श्रीकांत यांनी आधी आपल्या मुलांना गळफास दिला. त्यानंतर त्यांचे फोटो काढून ते पत्नीला व्हॉट्‌सअप केले आणि नंतर स्वत: आत्महत्या केली. पत्नीला फोटो मिळताच तिने हा प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घरातून तीन मृतदेह ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत. पोलिसांनी घरातून मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. श्रीकांत यांच्या या कृत्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.