‘शिक्षकांचेही पहिल्या टप्प्यात लसीकरण व्हावे’

पुणे – राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील माध्यमिक शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शिक्षकांची करोना चाचणी करण्यात आली. आता प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत राज्याकडून विचार होईल. त्यावेळीही सर्व शिक्षकांना करोना चाचणी करण्यास सांगण्यात येईल. मात्र, त्याऐवजी दुसऱ्या टप्प्यात या शिक्षकांना लस द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग शासनाच्या सूचनेनुसार सुरू झाले. मात्र, काही पालकांनी सुरुवातीच्या काळात मुलांना शाळेत पाठवण्यास सकारात्मकता दर्शवली नव्हती. मात्र, आता शाळेतील मुलांची संख्या वाढली असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येते.

दरम्यान, प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत शासनाकडून अद्याप कुठल्याही सूचना नसल्या तरी जिल्हा परिषद पातळीवर पदाधिकाऱ्यांनी पूर्वतयारी करून ठेवण्याच्या सूचना पूर्वीच दिलेल्या आहेत.

त्यानुसार प्रशासनाकडून सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचच एक भाग म्हणून उपाध्यक्ष शिवतरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिक्षकांना लस देण्याची मागणी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.