अखेर राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

मुंबई – अनुदानित, अशासकीय शाळांतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाला सुधारित वेतन लागू करण्याबाबतचा शासन निर्णय आज प्रसिध्द झाला आहे. त्यामुळे आता राज्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना आज अखेर सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.

सातवा वेतन आयोग शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर शिक्षकांना लागू होण्याची अशी ही पहिलीच वेळ आहे. याआधी पाचवा आणि सहावा वेतन आयोग शिक्षकांना उशिरा लागू झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.