कराड रोटरी क्‍लबतर्फे शिक्षकांचा गौरव

कराड – कराड रोटरी क्‍लब यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या नेशन बिल्डर पुरस्काराने यंदा कराडमधील अठरा शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचा यात समावेश आहे.

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेवून हा कार्यकम घेण्यात आला होता. पुरस्कार वितरण रोटरी क्‍लब ऑफ कराडचे प्रेसिडेंट रो.गजानन माने. सेक्रेटरी- रो. डॉ. शेखर कोगनुळकर यांच्या हस्ते झाले. लिटरसी डायरेक्‍टर- रो. राहुल पुरोहित. प्रोजेक्‍ट चेअरमन रो.किरण जाधव. जगदीश वाघ, रघुनाथ डुबल, धनंजय जाधव, शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रदीप रवलेकर तसेच रोटरी क्‍लबचे सदस्य उपस्थित होते.

प्राथमिक स्तरातील राजश्री रवलेकर, मंजुषा चव्हाण , शुभांगी पवार, स्मिता रणदिवे, सुनील भिलारे, नाजुकबी जमादार, माध्यमिक स्तरातून – अनिल थोरात, जगन्नाथ माळी, राजेंद्र जाधव, जीवनराव थोरात, मीना थोरात, संगीता भोई, रवी जाधव, जयश्री शेंडगे, रुपाली तोडकर, नारायण जगताप, पूनम पवार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

तर उच्च माध्यमिक मधून डॉ. सुधीर कुंभार (के. बी. पी. हायस्कूल ढेबेवाडी) आदींचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो. डॉ. शेखर कोगनुळकर यांनी केले. रो. गजानन माने यांनी क्‍लबने केलेले कार्य विषद केले. सूत्रसंचालन रो. किरण जाधव यांनी केले. यावेळी सर्व विभागातील शिक्षकांनी सत्काराला उत्तर दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.