-परिचय
नाव ः श्री. सर्जे सुनील दत्तात्रय
जन्म दिनांक ः 01/06/1967
जन्म ठिकाण ः दहिगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर
प्राथमिक शिक्षण ः जि.प. प्रा. शाळा दहिगाव
माध्यमिक शिक्षण ः महर्षी शंकरराव मोहिते पाटील विद्यालय यशवंतनगर, अकलूज
महाविद्यालयीन शिक्षण ः पंढरपूर व पुणे अध्यापक विद्यालय पंढरपूर
सेवा दिनांक ः
18/07/1987 पासून
श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, भवानीनगर, ता. इंदापूर, जि. पुणे
मुख्याध्यापक नेमणूक ः
16/10/2012 पासून श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे श्री. छत्रपती हायस्कूल सणसर, ता. इंदापूर, जि. पुणे या विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत.
विद्यालयातील विविध स्पर्धांचे आयोजन. त्या मध्ये रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व व निबंध स्पर्धा तसेच कार्यानुभव अंतर्गत कागदापासून आकाश कंदील बनवण्याचे मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच विद्यार्थिनींनी स्वतः राख्या बनवून सिमेवरील जवानासाठी पाठविण्यात येतात. विद्यालयातील विद्यार्थी व वृक्षांना राख्या बांधण्याचा कार्यक्रम घेण्यात येतो. तसेच विद्यालयात दरवर्षी नवरात्रामध्ये “भोंडला’ व “खाना खजाना’ खाऊ गल्ली अशा प्रकारे विविध उपक्रम राबवले जातात.
सन 2014 पासून विद्यालयातील सर्व कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून विद्यालयातील गरजू व होतकरू मुला-मुलींना शालेय गणवेशाचे वाटप केले जाते. त्याचप्रमाणे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन संपूर्ण वर्षाचा शालेय खर्च केला जातो. सन 2018 मध्ये शरयू फाऊंडेशनच्या अध्यक्षा मा. सौ. शर्मिला वहिनी साहेब यांच्या मार्गदर्शनातून पर्यावरणपूरक शाडूचे गणपती बनवण्याची कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांकडून 125 गणपती बनवण्यात आले. त्याची रंग रंगोटी करून त्याचे प्रदर्शन भरवण्यात आले. तसेच शीड बॉल बनवून त्याचा वृक्ष लागवडीसाठी उपयोग करण्यात आला. संगणक युगामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यमंत्री मा. दत्तामामा भरणे यांच्या सहकार्याने 5 वर्ग खोल्या डिजीटल करण्यात आल्या. इंदापूर तालुका “रोटरी क्लब’ यांच्या माध्यमातून 1 प्रोजेक्टर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी मिळाला.
या सर्व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन प्रशांतदादा काटे व सर्व संचालक यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभते.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक व सणसर ग्रामपंचायतीचे सरपंच ऍड. रणजितभैया निंबाळकर व उपसरपंच सौ. राजश्रीताई गुप्ते व सर्व सदस्य यांच्या सहकार्यातून शाळेला येणाऱ्या विविध अडचणी सोडवण्यात येतात. शाळेला आवश्यक असणाऱ्या बांधकाम व ग्रीलचेक काम त्यांच्या सहकार्यातून पूर्णत्वास येत आहे. मा. विक्रमभैया निंबाळकर यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी 1 वर्गखोली डिजिटल करून दिलेली आहे. सणसर विकास मंचच्या माध्यमातून विद्यालयास रंगरंगोटीच्या माध्यमातून बोलक्या भिंती करण्याचे कार्य करण्यात आले. यासाठी सणसर विकास मंचाचे सर्व सहकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. करोना महामारीमुळे सध्या “शाळा बंद पण शिक्षण चालू’ हा उपक्रम राबविला जात आहे. ऑनलाईन तासिकेस सहभागी होत नाहीत त्यांच्यासाठी “शिक्षक आपल्या दारी’ हा उपक्रम विद्यालयामार्फत राबविला जातो.
(शब्दांकन : गोकुळ टांकसाळे, भवानीनगर)
शाळेला मिळालेले पुरस्कार
1) 2018- जिल्हास्तरीय उपक्रमशील शाळा पुरस्कार माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संस्था शिरूर हवेली यांचे मार्फत.
2) 2019- कृतिशील शाळा पुरस्कार महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती पुणे जिल्हा यांचेमार्फत.
वैयक्तिक पुरस्कार
डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट यांचेमार्फत आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार 2018
इवलेसे रोप लावीयले द्वारी , तयाचा वेलू गेला गगनावरी या उक्तीप्रमाणे विद्यालयाची यशस्वीततेकडे वाटचाल चालू आहे. यासाठी श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे सर्व आजी माजी सन्माननीय पदाधिकारी तसेच सणसर ग्रामपंचायतीचे सर्व आजी, माजी सन्माननीय पदाधिकारी सर्व ग्रामस्थ विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.