-परिचय
पूर्ण नाव : श्री. रमेश रामचंद्र मचाले,
जन्म दिनांक : 20/02/1968, शिक्षण : बी.ए.बी.एड्, डी.एस.एम
पद : प्राचार्य
श्री छत्रपती हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज भवानीनगर
प्राथमिक शिक्षण : जि.प. प्राथमिक शाळा रणगाव
विद्यालयीन शिक्षण : वालचंद विद्यालय व ज्युनि. काॅलेज कळंब, ता. इंदापूर
महाविद्यालयीन शिक्षण : आर्टस अॅण्ड काॅमर्स काॅलेज, कळंब
शिक्षक म्हणून नोकरी सुरुवात ः 1999 पासून मुख्याध्यापकपदी नियुक्त ः 12/6/2000 ते 30/6/2005 पर्यंत प्रभारी मुख्याध्यापक श्री छत्रपती हायस्कूल सिद्धेश्वर निंबोडी, ता. बारामती, जि. पुणे – 1/7/2005 पासून नियमित मुख्याध्यापक रिक्तपदी नेमणूक
– शाळेतील मुलांच्या गुणवत्तावाढीसाठी, विविध उपक्रम राबविले. यामध्ये विद्यार्थी गृहभेट योजना, पालक सभा, रात्र अभ्यासिका, विद्यार्थी उद्बोधन वर्ग, जादा तासिका, माता पालकांचे मेळावे, 100%पट नोंदणी, 100% उपस्थिती, सहशालेय उपक्रम, स्पर्धा परीक्षांचे आयोजन अतिरिक्त पूरक मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, परिसर भेट, विविध शालेय समित्यांची स्थापना, अपूर्व विज्ञान मेळावे. विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या शिक्षणासाठी विविध प्रकारे योगदान दिले यामध्ये
1) विद्यार्थी दत्तक योजना
2) गरीब, हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट
3)सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत मिळवून दिली.
4)रोटरी क्लबच्या माध्यमातून शाळेला संगणक प्राप्त केले जेणेकरून विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान प्राप्त होण्यास मदत झाली.
5) पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शाळेला संगणक संच मिळवून दिले
6) विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी त्यांना वाचन करण्यासाठी मा. शिक्षक आमदार श्री. भगवानराव साळुंखे व श्री. दत्तात्रय सावंत सर यांचे फंडातून शाळेला पुस्तके व विज्ञान साहित्य, गणित पेटी प्राप्त करून घेतली.
नोकरीला लागल्यापासून पहिल्या दिवसापासूनच मुख्याध्यापकपदाची जबाबदारी खांद्यावर पडली. एक आव्हान म्हणून जबाबदारी स्वीकारली. सुरुवातीच्या काळात अनेक संकटांचा सामना करावा लागला. दररोज 80 ते 90 कि.मी. प्रवास करावा लागत असे. पत्र्याच्या शेडमध्ये वर्ग भरायचे. चारही बाजूंनी पत्रा. सर्व ऋतुमध्ये त्रास सहन करावा लागला. परंतु, अशा अत्यंत अडचणीच्या काळात सुद्धा “विद्यार्थी केंद्रबिंदू’ मानून सर्व शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन काम केले. हे काम करीत असताना श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले व त्याला जोड म्हणून सिद्धेश्वर निंबोडीतील ग्रामस्थांचेही सहकार्य लाभले.
सुरुवातीची 1999 ते 2005 अशी 6 वर्षे तुटपुंज्या मानधनावर काम केले. म्हणतात ना “इंतजार का फल मिठा होता है’ केलेले परिश्रम कधीही वाया जात नाही याची प्रचिती 2006 मध्ये आली व शाळेला 40% अनुदान आले. यासाठी मा. अजितदादा पवारसाहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले व त्यांच्याच सहकार्यामुळे “यशवंत ग्रामसमृद्धी योजने’मधून सुंदर अशी एकूण 12 वर्गखोल्यांची इमारत, ग्राऊंड शाळेला मिळाले. तसेच श्री छत्रपती सहकारी सा.का.लि. भवानीनगर यांचेकडून मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह पाण्यासाठी बोअरवेल अशी सुविधा उपलब्ध करून घेण्यामध्ये योगदान देण्याचा प्रयत्न केला. आज एका छोट्या रोपट्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्यामध्ये माझा खारीचा वाटा आहे या गोष्टीचे समाधान वाटते.
मिळालेले पुरस्कार
1) पंचायत समिती इंदापूर शिक्षण विभाग व भगवानराव भरणे प्रतिष्ठान इंदापूर यांचेवतीने “गुणवंत मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मानीत 2019-20 मध्ये
2) बारामती ता. माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ बारामती यांचा “गुणवंत मुख्याध्यापक’ पुरस्कार- 2016
3) भाषा सहोदरी हिंदी आंतरराष्ट्रीय पुरस्कार हैद्राबाद-2018
4) भाषा सहोदरी हिंदी आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिल्ली- 2019
अशाप्रकारे विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल त्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.
-शब्दांकन
गोकुळ टांकसाळे, भवानीनगर