पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात विविध शैक्षणिक संस्था व शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला, तसेच विविध उपक्रम राबविण्यात आले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे कोथरूड संकुलात शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला. या वेळी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले. डॉ. संजय उपाध्ये, ॲड. संतोष पवार,
डॉ. दत्ता दंडगे, डॉ. प्रियंकर उपाध्याय, डॉ. मृदुला कुलकर्णी, डॉ. पी. जी. धनवे, कुलसचिव गणेश पोकळे, विष्णू भिसे, डॉ. टी. एन. मोरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. मिलिंद पात्रे यांनी केले. गणेश पोकळे यांनी आभार मानले.
राजश्री शाहू वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
जेएसपीएम संचालित राजश्री शाहू वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त प्राचार्य प्रशांत माने- देशमुख यांच्या हस्ते डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रा. श्वेता कंगळे यांनी प्रास्ताविक केले. ग्रंथपाल पार्थ कुदळे यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रा. प्रियंका मेंढेकर यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. प्रा. अमृता लोंढे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकुल संचालक डॉ. वसंत बुगडे, डॉ. संजय सावंत यांनीही मार्गदर्शन केले.
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या वतीने शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात व्याख्याते प्रा. विशाल गरड, सामाजिक न्याय विभागाचे उपआयुक्त रवींद्र कदम, संस्थेच्या सरचिटणीस प्रमिला गायकवाड, संयुक्त चिटणीस ॲड. भगवानराव साळुंखे, खजिनदार विजयसिंह जेधे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. किशोर नवले यांनी मनोगत व्यक्त केले.
सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीवर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. दीपक गायकवाड यांनी केले.
दी पूना गुजराती केळवणी मंडळ
शिक्षक दिनानिमित्त दी पूना गुजराती केळवणी मंडळाने संस्थांतर्गत शाळा ते महाविद्यालयांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान केला गेला.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष राजेश शहा, सचिव हेमंत मणियार, खजिनदार महेश धरोड, सहसचिव प्रमोद शाह, संदीप शाह, विश्वस्त सत्येन पटेल, माजी अध्यक्ष हसमुख पटेल, तसेच संस्थेतील सर्व विभागातील प्राचार्य उपस्थित होते.
याप्रसंगी एकूण १५ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आदर्श पुरस्काराने, तर विविध क्षेत्रांत प्रावीण्यप्राप्त १३ शिक्षकांचा सन्मान केला गेला. आर. सी. एम. गुजराती प्रशालेच्या प्राचार्या मोनलवेन वागेट यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.