ओतूर – शिक्षक हे समाजाचे आधारस्तंभ आहेत. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक आदर्श नागरिक व समाज घडविण्याचे काम शिक्षक करतात. गुरू हेच आपला मार्गदर्शक व प्रेरणास्थान आहेत, असे प्रतिपादन जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी केले.
जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षक संघ व जुन्नर तालुका शिक्षक लोकशाही आघाडीच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर तालुक्यातील माध्यमिक विद्यालयांतील 29 जणांचा आदर्श मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथे देऊन सन्मान करण्यात आला असल्याची माहिती माध्यमिक शिक्षक संघ जुन्नरचे अध्यक्ष पंकज घोलप व शिक्षक लोकशाही आघाडी जुन्नरचे अध्यक्ष रोहिदास वेठेकर यांनी दिली. या कार्यक्रमात आमदार बेनके बोलत होते.
यावेळी जुन्नरचे सभापती विशाल तांबे, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, शरद लेंडे, सरपंच सविता वाघ, संतोष देविदास तांबे, रंजना काळे, सुरेखा वेठेकर, संगीता वाघ, माध्यमिक शिक्षक संघ पुणेचे अध्यक्ष जी. के. थोरात, शिक्षक लोकशाही आघाडी पुणेचे अध्यक्ष के. एस. ढोमसे, शरद चौधरी या मान्यवरांच्या हस्ते गुणवंत शिक्षकांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी ग्रामविकास मंडळाचे सचिव प्रदीप गाढवे, दत्तात्रय अरकडे, चंद्रकांत दुरगुडे, संतोष सहाणे, रवींद्र डुंबरे, रमेश ढोमसे, सीमा ढमाले, जयश्री चौधरी, शोभा तांबे, सरिता आबक, प्रशांत घुले, महेंद्र बोऱ्हाडे, सुनील पोकळे, मच्छिंद्र कुसाळकर, पांडुरंग गिते, विजय घोलप व अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचलन भाऊसाहेब खाडे यांनी केले, तर माऊली अडागळे यांनी आभार मानले.