गोंदिया – दारू पिऊन शाळेतील वर्गातच झोप काढल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील गोरेगांव तालुक्यात असलेल्या निंबा येथील जिल्हा परिषद शाळेत घडली आहे. शिक्षकाच्या या प्रतापानंतर ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ए.जी. मरसकोल्हे असे संबंधित दारू पिऊन शाळेत झोपलेल्या शिक्षकाचे नाव आहे. मरसकोल्हे हे मद्यधुंद अवस्थेत शाळेत आले होते. दारूचा डोस जास्त झाल्याने ते शाळेतील वर्गातच आडवे झाले आणि त्यांनी तिथेच झोप काढली. दारूची नशा एवढी चढली होती की आजूबाजूला काय होत आहे हे सुद्धा त्यांना समजत नव्हते.
विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना जाऊन हा प्रकार सांगितल्यानंतर पालक शाळेत आले. त्यांनी हा प्रकार पाहिला आणि त्या शिक्षकाचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडीओही काढला. तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. पालकांनी मरसकोल्हे यांची तक्रार खंड विकास अधिकारी यांच्याकड़े केल्याचे केली आहे. पोलिसांनी सदर शिक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून मद्यपी शिक्षकावर गोरेगाव ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.