#व्हिडिओ: विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाची धुलाई

पुणे: पुण्यातील एका खाजगी शिकवणीत विद्यार्थिनींचे लैंगिक शोशान होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती पालकांना समजताच त्यांनी या नराधम शिक्षकाची चांगलीच धुलाई केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात हा प्रकार घडला असून, सिंहगड पोलिसांनी संबंधित क्लास चालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. सूर्यप्रकाश पाटील (वय ३४) असं अटक करण्यात आलेल्या आरोपी शिक्षकाचं नाव आहे.

दरम्यान या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून विदयार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जर अशा ठिकाणी मुलींचे लैंगिक शोषण होत असेल तर आम्ही आमच्या मुलींना शिकवूंयचे कि नाही असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत.

मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु आसोलीचे विद्यार्थिनींनी सांगितले आहे. एका मुलीने हिम्मत दाखवत आपल्या पालकांना या प्रकाराबाबत सांगितलय नंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच या पूर्वी देखील या नराधम शिक्षकाने एका महिलेवर लैंगिक अत्याचार केले होते अशी कबुली त्याच्या पत्नीने दिली असल्याचे एका विद्यार्थिनीच्या पालकांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.