पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर; कोणाला मिळालं तिकीट? जाणून घ्या

मुंबई – पदवीधर-शिक्षक मतदार संघासाठी भाजपा केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी पदवीधर विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2020 साठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

भाजपकडून प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, पुणे पदवीधरसाठी संग्राम देशमुख, औरंगाबादसाठी शिरीष बोराळकर, नागपूरसाठी संदीप जोशी, तर अमरावती पदवीधरसाठी नितीन धांडे यांना उमेदवारी दिल्याचे घोषित करण्यात आले आहे.

पुण्यात यांच्यात रंगणार सामना –

संग्राम देशमुख (भाजप) vs महाविकास आघाडी Vs रूपाली पाटील ठोंबरे (मनसे) vs अभिजीत बिचकुले यांच्यात सामना रंगणार आहे.

नागपुरात अभिजित वंजारी (काॅंग्रेस) Vs संदीप जोशी (भाजप) असा सामना रंगणार आहे.

दरम्यान, पुण्यातून माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. तसेच महापौर मुरलीधर मोहोळ, रवींद्र भेगडे, अभाविपचे राजेश पांडे यांच्याही नावाची चर्चा सुरू होती. अखेर पुणे पदवीधरसाठी संग्राम देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.