मुंबई – भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीचा नफा चौथ्या तिमाहीत 7.4 टक्क्यांनी वाढून 9,926 कोटी रुपये इतका झाला आहे.
कंपनीचा महसूल 15.8 टक्क्यांनी वाढून 50,591 कोटी रुपये इतका झाला आहे. प्रथमच या कंपनीचा महसूल 50हजार कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. सरलेल्या वर्षामध्ये टीसीएस कंपनीने उत्तम कामगिरी केली आहे. या वर्षात कंपनीचा महसूल वाढून 25 अब्ज डॉलरच्या पुढे गेला आहे.
सरलेल्या पूर्ण वर्षातील नफा 14.8 टक्क्यांनी वाढून 38,327 कोटी रुपये झाला आहे. करानाच्या काळामध्ये कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांना घरातून काम करावे लागत होते. आता आगामी काळामध्ये कंपनीचे काम अधिक वेगाने होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरी आज कंपनीच्या शेअरचा भाव मात्र काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले.