FIH President – आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा तैय्यबा इकराम यांची फेरनिवड होणार असून याची अधिकृत घोषणा ९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मस्कत, ओमान येथे होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात येणार आहे.
अध्यक्षपदासाठी नामांकन भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. आता मस्कत येथे होणाऱ्या सर्वसाधारण सभेत पदाधिकारी अध्यक्ष निवडतील. अध्यक्षपदासाठी आवश्यक असलेले सर्व निकष तैय्यब इकराम हे पूर्ण करतात.
इकराम यांचा हॉकीशी जुने संबंध आहेत. त्यांनी पाकिस्तान व चीन यासारख्या देशांचे प्रशिक्षक म्हणून देखील कामाकाज पहिले आहे. याचबरोबरीने ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे सदस्य देखील आहेत. इकराम हे २०१६ पासून आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य देखील होते. त्यांची ५ नोव्हेंबर २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
मस्कत येथील सर्वसाधारण सभेमध्ये कार्यकारी मंडळाच्या महिला सदस्यांसाठी देखील निवडणूक घेण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला कार्यकारी मंडळातील २ पदे रिक्त असून या पदांसाठी उरुग्वेच्या डॅनय अँड्राडा बॅरिओस, जर्मनीच्या कॅटरिन कौशके आणि झांबियाच्या हेझेल केनेडी या इच्छूक आहेत.