कर भेदभाव करणारा नसल्याचे भारताकडून स्पष्टीकरण..
नवी दिल्ली – भारत सरकारने फेसबुक, गुगल यांसारख्या डिजिटल सेवा देणाऱ्या कंपन्यांवर कर सुरू केला आहे. हा निर्णय पूर्ण विचार करून घेतलेला आहे. त्यामुळे या विषयावर फेरविचार केला जाणार नसल्याचे भारत सरकारने स्पष्ट केले आहे.
हा निर्णय कोणा एका देशातील कंपनीविरुद्ध घेतलेला नाही हेही भारत सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले. दक्षिण आशियातील काही देश अमेरिकेतील डिजिटल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांवर भेदभावपूर्ण कर लावत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. याची अमेरिकेतील व्यापार विभागाकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी वृत्त माध्यमांनी भारतीय आणि अमेरिकन वकिलातीचे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. फ्रान्स सरकारने असाच कर लावल्यानंतर अमेरिकेने फ्रान्सच्या आयातीवर कर लावायला सुरुवात केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये भारतात कार्यरत नसलेल्या डिजिटल कंपन्यांच्या सेवा आणि वस्तू विक्रीवर लावला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे.