20 हजार कोटींची जीएसटीची करचुकवेगीरी उघड

नवी दिल्ली – चालू आर्थिक वर्षात आत्ता पर्यंत सरकारने 20 हजार कोटी रूपयांची जीएसटीची करचोरी उघड केली आहे. कर विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की जीएसटी करप्रणालीतील अन्य भ्रष्टाचार आणि करचुकवेगीरी रोखण्यासाठी सतर्कतेने उपाययोजना सुरू आहेत. बांधकाम क्षेत्रातील लोकांना जीएसटी प्रणालीबाबत आणि त्यातील नवीन तरतूदीबाबत काही अडचणी आणि शंका असल्यास त्याच्या सोडवणुकीसाठी या क्षेत्रातील व्यक्तींची एक स्वतंत्र बैठक लवकरच बोलावण्यात येत आहे अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली.

बांधकाम क्षेत्रासाठी जीएसटीत मागच्याच आठवड्यात काही सवलती देण्यात आल्या आहेत. तथापी ईनपुट क्रेडीट बाबत दावे करताना बांधकाम व्यावसायिकांना काही अडचणी येत आहेत. त्याचे निराकरण या बैठकीत केले जाणार आहे.

चालू आर्थिक वर्षातील जी 20 हजार कोटी रूपयांची करचोरी उघड झाली आहे त्यातील 10 हजार कोटी रूपये वसुल करण्यात आले आहेत. जीएसटीसाठी आत्तापर्यंत देशातील 1 कोटी 20 लाख जणांनी नोंदणी केली असून ही नोंदणी आगामी काळात आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. जीएसटी कर प्रणालीत सध्ये जे पाच टप्प्यांचे कर लागू आहेत ते दोन किंवा तीन टप्प्यांवर आणले जाण्याची शक्‍यता आहे असेही त्यांनी नमूद केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.