फ्रांस सरकारकडून करमाफी ही अंबानींवरची मोदी कृपाच – काँग्रेस

नवी दिल्ली: अनिल अंबानी यांच्या फ्रांसमधील सबसीडीयरी कंपनीला राफेलकराराची घोषणा होताच फ्रांस सरकारकडून करमाफी जाहीर होणे ही अंबानींवरची आणखी एक मोदी कृपा आहे असा आरोप कॉंग्रेसच्यावतीने करण्यात आला आहे. फ्रांसच्या एका दैनिकानेच हे वृत्त प्रकाशित केल्याचे उघड झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रीया देताना कॉंग्रेस प्रवक्ते सुर्जेवाला यांनी वरील टिपण्णी केली.

मोदी आणि अंबानींचे हे कनेक्‍शन कुठेकुठे जोडले गेले आहे ते आता हळूहळू बाहेर येत आहे असे ते म्हणाले. खुद्द पंतप्रधान मोदी हेच अबांनीसाठी मध्यस्थ म्हणून काम करीत होते हे या साऱ्या व्यवहारांमधून स्पष्ट झाले आहे. फ्रांस सरकारने अंबानी यांच्या सरकारला जी करमाफी दिली तशी कर माफी फ्रांस सरकारने अन्य किती कंपन्यांना दिली असा सवालही सुर्जेवालांनी विचारला.

चोैकीदारच चोर निघाल्याचे हा आणखी एक महत्वाचा दाखला आहे असेही त्यांनी नमूद केले. ज्यांना मोदींचे आशिर्वाद आहेत त्यांना काहीही प्राप्त होऊ शकते. मोदी है तो मुंमकिन है असा टोमणाही सुर्जेवालांनी यावेळी मारला. अंबानी यांनी या आरोपाचा या आधीच इन्कार केला आहे. त्यांनी म्हटले आहे की फ्रांसमधील कायद्याच्या चौकटीतच ही करमाफी मिळाली असून त्यात कोणताही गैरप्रकार झालेला नाहीं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.