मला लढायला शिकवले, माघार घ्यायला नाही

ऍड. उदयसिंह पाटील यांच्या प्रचाराचा विंग येथे शुभारंभ

कराड – उदय पाटील पाठिंबा देणार आहेत, अर्ज मागे घेणार आहेत, असे मेसेज व्हॉटस्‌ऍपवर फिरत आहेत. उंडाळकर कुटूंब कोणापुढे झुकणार नाही, मला माझ्या घरच्यांनी लढायला शिकवले आहे, माघार घ्यायला नाही. येत्या 21 तारखेला या मंडळींचा हिशोब होणार आहे, असा इशारा रयत संघटनेचे उमेदवार उदय पाटील यांनी विरोधकांना दिला.

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील उमेदवार यांच्या प्रचाराचा प्रारंभ झाला यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी सहकारमंत्री विलासराव पाटील उंडाळकर, सभापती फरिदा इनामदार, महादेव देसाई, वसंतराव जगदाळे, वैशाली जाधव, राजू मुलाणी, अशोक भोसले, धनाजी काटकर, सर्जेराव लोकरे, पांडूरंग पाटील, आप्पासाहेब गरूड, प्रदीप पाटील, भागवत कणसे, विजया माने, पुष्पा महिपाल, पोपटराव पाटील उपस्थित होते.

ते म्हणाले, संघटनेच्या जीवावर ही मंडळी राजकारण करत आहेत. हीच संघटना यांना राजकारणातून खाली खेचल्याशिवाय गप्प बसणार नाही. येत्या 21 तारखेला मतदान होत असून यात सगळ्यांचा हिशोब होणार आहे. माझ्या अर्ज माघारी घेण्याच्या वावड्या उठत आहेत, मात्र मी लढाऊ बाण्याचा आहे. मला ज्या माऊलीने जन्म दिला, तिने फक्त लढाईला शिकवले आहे. घरात 35 वर्षे सत्ता असतानाही सत्तेचे चटके मी सोसलेत. सत्ता हे माझे अंतिम ध्येय नाही. ज्यांनी सत्तेचा असूड संघटनेवर उगारला आहे त्यांना धडा शिकवण्यासाठी माझी लढाई असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.