Tata Steel Chess India Blitz Tournament 2024 : जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसनने रविवारी कोलकाता येथे चमकदार कामगिरी केली आणि एक फेरी बाकी असताना ब्लिट्झ प्रकारतही विजेतेपद पटकावले. टाटा स्टील चेस इंडिया टूर्नामेंटमध्येही त्याने दुसरी ट्रॉफी जिंकली. शुक्रवारी रॅपिड प्रकारातील विजेतेपद पटकावल्यानंतर लगेचच शनिवारी 33 वर्षीय नॉर्वेच्या खेळाडूने चमकदार कामगिरी करत अंतिम सामन्यापूर्वीच 12 गुणापर्यत मजल मारली होती आणि विजेतेपद निश्चित केलं होते. कारण 12 गुणांपर्यंत इतर कोणाताही स्पर्धक पोहोचू शकणार नव्हता.
VIDEO | “I don’t often get a chance to play in India, but I think the enthusiasm for Chess here is unparalled. Another great thing to be playing here against the kids and beat them at their home soil,” says world number one and winner of TATA Steel Chess India, Rapid & Blitz… pic.twitter.com/1GHta51swm
— Press Trust of India (@PTI_News) November 17, 2024
कार्लसनने अंतिम फेरीत विदित गुजराथीचा पराभव करून या स्पर्धेचा शानदार समारोप केला आणि सलग तीन विजय आणि एकूण 13 गुणांसह कार्लसनने ‘ब्लिट्झ’चा मुकुट आपल्या नावे केला. अशाप्रकारे त्याने कोलकातामध्ये दुसऱ्यांदा दोन विजेतेपद (Magnus Magic in Kolkata! Carlsen completes stunning double) पटकावले आहेत. यापूर्वी 2019 मध्ये त्याने दोन ट्रॉफी जिंकल्या होत्या.
रॅपिड प्रकारातही मारली बाजी….
दरम्यान, मॅग्नस कार्लसनने शुक्रवारी टाटा स्टील चेस इंडिया स्पर्धेत रॅपिड प्रकारात विजेतेपद पटकावले होते. शेवटच्या दिवशी चमकदार कामगिरी करत त्याने खुल्या गटाचे विजेतेपद आपल्या नावावर केले तर भारताचा आर प्रज्ञानंद दुसऱ्या स्थानी राहिला. कार्लसनने नऊपैकी 7.5 गुण मिळवले आणि त्याच्या जवळच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा दोन गुणांनी तो पुढे राहिला आणि विजेतेपद जिंकले. प्रग्नानंद आणि वेस्ली सो प्रत्येकी 5.5 गुणांसह बरोबरीत राहिले परंतु भारतीय खेळाडू प्रग्नानंद टायब्रेकच्या चांगल्या गुणांमुळे तो उपविजेता ठरला. त्यामुळे वेस्ली सो याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागले.
#BiharWACT2024 : भारताचा सलग पाचवा विजय, अखेरच्या साखळी सामन्यात जपानचाही उडवला धुव्वा….
दुसरीकडे महिला गटात रशियाच्या अलेक्झांड्रा गोर्याचकिनाने आपली चांगली कामगिरी सुरू ठेवत 7.5 गुणांसह रॅपिड प्रकारात विजेतेपद पटकावले. जॉर्जियाची नाना दजाग्निडेज़ 5.5 गुणांसह प्रथम उपविजेती तर भारताच्या वंतिका अग्रवाल पाच गुणांसह दुसरी उपविजेती ठरली.