नवी दिल्ली- सध्या संपूर्ण जगभरात प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वाढती वाहनांची संख्या. आता याच प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी जगातील अनेक वाहन कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने निर्मिती करण्यास सुरवात केली आहे.
दरवर्षी अनेक नामांकित कंपन्या आपले वेगवेळगे इलेक्ट्रिक वाहनांचे मॉडेल बाजारात आणत असतात. तसेच त्याला खरेदीदारांकडून मोठ्या प्रमाणात पसंती देखील मिळत असते. अश्याच एका नामांकित कंपनीचे नवीन इलेक्ट्रिक कारचे मॉडेल लवकरच बाजारात येणार आहे. टाटा मोटर्सची सब-कॉम्पॅक्ट ‘एसयूव्ही टाटा पंच’ ही कार भारतामध्ये सर्वात लोकप्रिय ठरली आहे. आता याच कारला टाटा कंपनी इलेक्ट्रिक अवतारामध्ये लॉन्च करणार आहे.
कारची वैशिष्ट्ये –
टाटा पंच EV कारमध्ये समोरच्या भागात लोखंडी जाळीवर काही अद्वितीय बॅजिंगसह ऑफर केले जाणार आहे. इंटीरियरच्या बाबतीत या कारमध्ये फ्लोटिंग 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, प्रीमियम अपहोल्स्ट्री, फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील, स्वयंचलित हवामान नियंत्रण आणि अँड्रॉइड ऑटो आणि कार प्ले यांचा समावेश असणार आहे. तसेच कारमध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक देखील असणार आहे. जे कि डीफॉल्टनुसार स्वयंचलितपणे कार्य करणार आहे. तसेच तिच्या धावण्याच्या क्षमतेबद्दल जर बोलायचे झाले तर कंपनीकडून टाटा पंच EV कारला दोन बॅटरी पॅक देण्यात येणार असून ती 250 ते 315 किमीपर्यंत धावू शकणार आहे. तसेच कंपनीकडून मोड मध्ये इको, सिटी आणि स्पोर्ट असे तीन मोड देण्यात येणार आहे.
इतकी असू शकते किंमत –
दरम्यान, कंपनीने टाटा पंच ईव्ही कारच्या किंमतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार या कारची किंमत अंदाजे 10 ते 12 लाख रुपयांच्या दरम्यान असणार आहे. तसेच ही कार बाजारात आल्यानंतर तिची स्पर्धा थेट Citroen eC3 या कारशी होणार आहे.