नवी दिल्ली – टाटा मोटर्सने आपल्या व्यवसायिक वाहनांच्या दरात 1 जानेवारीपासून 2% पर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे टाटा मोटर्सच्या ट्रक आणि बसेसच्या किमती वाढणार आहेत. उत्पादन खर्च वाढत असल्यामुळे ही दरवाढ करावी लागत असल्याचे टाटा मोटर्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान अशोक लेलँड या व्यवसायिक वाहन निर्माण करणार्या कंपनीनेही आपल्या वाहनांच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही दरवाढ तीन टक्क्यापर्यंत असेल आणि याची अंमलबजावणी एक जानेवारीपासून सुरू होईल असे या कंपनीने म्हटले आहे. या अगोदरच मारुती सुझुकी, मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू, ऑडी इत्यादी प्रवासी वाहन निर्मात्या कंपन्यांनी दरवाढ जाहीर केली आहे.