नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटविण्यासंदर्भात ऐतिहासिक प्रस्ताव सोमवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. यामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाल्याचे दिसत आहे. दोन्ही शेजारी देशांचे संबंध आणखीच बिघडतील, असा थयथयाट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. या मुद्द्यावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आणि भारताचा माजी क्रिकेटपटू व खासदार गौतम गंभीर ट्विटरवर एकमेकांना भिडले आहेत.
शाहिद आफ्रिदी म्हणाला कि, संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार काश्मिरींना त्यांचे अधिकार दिले पाहिजेत. आपल्यासारखेच स्वातंत्र्याचे अधिकार त्यांना मिळाले पाहिजेत. संयुक्त राष्ट्राची निर्मिती का झाली आहे? ते झोपलेले का आहेत? काश्मीरमध्ये होत असलेलं आक्रमण आणि गुन्हे माणुसकीविरोधात आहेत, याची नोंद घेतली गेली पाहिजे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, असे ट्विट शाहिद आफ्रिदीने केले. आफ्रिदीने हे ट्विट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही टॅग केलं आहे.
Kashmiris must be given their due rights as per #UN resolution. The rights of Freedom like all of us. Why was @UN created & why is it sleeping? The unprovoked aggression & crimes being committed in Kashmir against #Humanity must be noted. The @POTUS must play his role to mediate
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) August 5, 2019
आफ्रिदीच्या ट्विटवर गौतम गंभीरने खरमरीत उत्तर दिले आहे. गंभीर म्हणाले कि, आफ्रिदीने एकदम बरोबर बोलले आहे. काश्मीरमध्ये आक्रमण आणि गुन्हे माणुसकीविरोधात आहेत. या मुद्यावर प्रकाश टाकल्याबद्दल त्याचे अभिनंदन करायला हवे. केवळ सर्व प्रकारचे मानवाधिकाराचे उल्लंघन पाकव्याप्त काश्मीरमध्ये होत असल्याचे आफ्रिदी सांगण्यास विसरले आहे. काळजी करू नका, आम्ही लवकरच त्यावरही तोडगा काढू, असे गंभीरने आफ्रिदीला सुनावले आहे.
@SAfridiOfficial is spot on guys. There is “unprovoked aggression”, there r “crimes against humanity”. He shud be lauded ?for bringing this up. Only thing is he forgot to mention that all this is happening in “Pakistan Occupied Kashmir”. Don’t worry, will sort it out son!!! pic.twitter.com/FrRpRZvHQt
— Gautam Gambhir (@GautamGambhir) August 5, 2019