मुंबई – पंतप्रधान म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी शपथ घेतली. त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात 57 सदस्यांना स्थान मिळाले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली असून, लगेचच दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदींनी खात्यांचे वाटप केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील भाजपचे ‘रावसाहेब दानवे’ त्यांच्या वाटेल सार्वजनिक वितरण राज्यमंत्री हे खाते आले आहे. त्यामुळे आता त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार, याबाबत सध्या चर्चा रंगत आहेत. प्रदेशाध्यपदासाठी चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांच्या नावांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगूलागली आहे.
दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे प्रदेशाध्यक्षपदाचा अंतिम निर्णय घेतील. त्यामुळे तूर्तास रावसाहेब दानवेच प्रदेशाध्यक्षपदी राहणार असल्याचे भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.