तरणजितसिंग संधू भारताचे अमेरिकेतील नवे राजदूत

नवी दिल्ली : वरिष्ठ राजनैतिक अधिकारी तरणजितसिंग संधू यांची भारताचे अमेरिकेतील नवे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते हषवर्धन श्रृंगला यांची जागा घेतील. श्रृंगला यांची याआधीच परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती झाली आहे. ते उद्या (बुधवार) नवा कार्यभार स्वीकारणार असल्याचे समजते. अमेरिकेतील राजदूतपदी नियुक्ती झालेले संधू भारतीय परराष्ट्र सेवेतील (आयएफएस) 1988 च्या तुकडीचे अधिकारी आहेत.

ते सध्या श्रीलंकेत भारताचे उच्चायुक्त म्हणून कार्यरत आहेत. सुमारे तीस वर्षांच्या उल्लेखनीय कारकिर्दीत संधू यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. अमेरिकेतील भारतीय दूतावासात त्यांनी याआधी पहिले राजकीय सचिव म्हणून कार्य केले. संयुक्त राष्ट्रांमध्येही भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.