मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. जेठालाल, टप्पूसेना, डॉ. हाथी, बबिताजी, पोपटलाल आणि मराठमोळा एकमेव सेक्रेटरी भिडे हे सर्वच पात्र गेले अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
दरम्यान, याच मालिकेतील बाघा व्यक्तिरेखा साकारणाऱ्या ‘तन्मय वेकारिया’ला करोना विषाणूची लागण झाली आहे. स्वतः तन्मय यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर या संदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे. वेकारीया यांनी चाहत्यांना देखील काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
ओमीक्रॉनच्या वाढणाऱ्या प्रभावामुळे मनोरंजन क्षेत्रातील अनेक बड्या कलाकारांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे टीव्ही मनोरंजन आणि बॉलीवूडमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तन्मय वेकारिया यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटलं आहे की….”सर्वांना नमस्कार.!!
आपण सध्या एका वेगळ्या परिस्थितीतून जात आहोत. अशावेळी आपण सर्वांनी काळजी घ्यायला हवी. मला आता करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांत माझ्या संपर्कात जे आले असतील त्यांनी आपली चाचणी करुन घ्यावी. अशी विनंती मी त्यांना करतो.”