मुंबई – अभिनेत्री तारा सुतारियाने बोल्ड ड्रेस परिधान करत रॅम्प वॉक केला आहे. अलीकडेच मुंबईत झालेल्या फॅशन वीकमध्ये अभिनेत्रीने सहभाग नोंदवीला होता. अभिनेत्रीने रॅम्पवर पहिले पाऊल टाकताच तिचा हॉटनेस पाहून दर्शकांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. याचे कारण होते अभिनेत्रीचा बोल्ड लूक. अभिनेत्रीच्या या फोटोने सोशल मिडियावर धुकाकूळ घातला आहे.
मुंबईत आयोजित या फॅशन वीकमध्ये तारा सुतारिया गोल्डन कलरचा शिमरी गाऊन परिधान करून पोहोचली होती. अभिनेत्रीला हा गाऊन इतका खुलून दिसत होता की त्यामध्ये अभिनेत्रीची टोन्ड फिगर स्पष्टपणे दिसत होती. लुक पूर्ण करण्यासाठी ताराने मॅचिंग गोल्डन कलरची हाय हील्स घातली आणि केस मोकळे ठेवते होते त्यामुळे अधिकच सुंदर दिसत होती. अभिनेत्री या ड्रेसमध्ये इतकी ग्लॅमरस दिसत होती की रॅम्पवर येताच सर्वांना तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले.
तारा सुतारिया नुकतीच टायगर श्रॉफसोबत ‘हिरोपंती 2’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट जास्त चमत्कार करू शकला नाही पण तारा सुतारिया तिच्या ड्रेसेजमुळे सतत चर्चेत असते.