2014 मध्ये हिट झालेल्या “एक व्हिलन’चा सिक्वेल येणार असे निश्चित झाले आणि त्यामधील लीड रोलसाठी आदित्य रॉय कपूरबरोबर तारा सुतारियाचीही निश्चिती झाली. या सिक्वेलच्या सर्व कलाकार मंडळींची नावे नुकतीच जाहीर झाली आहेत.
जॉन अब्राहम, आदित्य रॉय कपूर, दिशा पाटणी आणि तारा सुतारिया ही मंडळी असलेल्या “एक व्हिलन 2’चे डायरेक्शन मोहित सुरी करणार आहे. एकता कपूर आणि भूषण् कुमारची निर्मिती असलेला हा सिनेमा पुढील वर्षी 8 जानेवारीला रिलीज होणार आहे.
तारा सुतारिया आणि आदित्य रॉय कपूर प्रथमच एकमेकांबरोबर असणार आहेत. यापूर्वी तारा सुतारिया “स्टुडंट ऑफ द इयर 2′ मध्ये होती. त्यानंतर “मरजवां’मध्ये तिला अगदी छोटा रोल मिळाला होता. त्या छोट्या रोलमध्येही ती प्रेक्षकांच्या चांगली लक्षात राहिली होती. विशेषतः
“मरजवां’ला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे तिच्या नावाभोवती एक वलय निर्माण झाले होते. त्याचाच फायदा तिला “एक व्हिलन 2′ साठी झाला आहे. “एक व्हिलन 2’चे शुटिंग या वर्षी जूनच्या सुमारास सुरू होणार आहे. अमेरिकेतील सायकोलॉजिकल थ्रीलर सिनेमा “गॉन गर्ल’वर याची कथा आधारलेली आहे.